बेळगाव (वार्ता) : येळ्ळूर येथील कुस्ती आखाड्याप्रसंगी आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणीच्या खटल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर बजावण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने आज रद्दबातल केले.
येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी कुस्ती आखाड्यावेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर सरकारने खटला दाखल केला होता.
या खटल्याच्या तारखांना प्रारंभी भिडेगुरुजी नियमित हजेरी लावत होते. मात्र मध्यंतरी कांही अपरिहार्य कारणास्तव न्यायालयाच्या तारखांना ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट काढण्यात आला होता. मात्र आज स्वत: भिडे गुरुजी यांनी बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयासमोर हजर राहून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली. यावेळी न्यायालयाने त्यांच्यावर बजावलेले वॉरंट रद्दबातल केले.
भिडे गुरुजींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शंकर बाळनाईक आणि अॅड. सुभाष पटण्ण हे न्यायालयीन काम पहात आहेत.
भिडे गुरुजी आज न्यायालयात हजर होण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या समवेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय
Spread the love बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …