
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग शिबिर यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुले- मुली, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, योग वर्ग शारीरिक शिक्षक व सर्व रहिवासी यांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा. येताना सोबत चटई किंवा जमखाना तसेच मुलींनी ट्रॅक सूट किंवा सलवार कमीज घालून यावे असे आवाहन क्रीडा भारती उत्तरचे सहकार्यवाह श्री. विश्वास पवार हे कळवितात.
Belgaum Varta Belgaum Varta