बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे येत्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या शहरातील विविध संस्था -संघटनांना धन्यवाद देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी आज शनिवारी सकाळी गणेशोत्सव दोन्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी चहापाण्यासाठी निमंत्रित केले होते.
त्यावेळी आपली पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एस.एन. सिद्धरामप्पा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे सचिव राजू सुतार यांनी देखील महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धारामप्पा व त्यांच्या सौभाग्यवती यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी, रमेश कळसन्नावर यांची समयोचित सन्मानार्थ विचार मांडले.
याप्रसंगी महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सरचिटणीस महादेव पाटील, पदाधिकारी शिवराज पाटील, रमेश कळसन्नावर, धनंजय पाटील, अजित कोकणे, शंकर बाबली महाराज, राजेंद्र हंडे अंकुश केसरकर, मदन बामणे, सुधाकर चाळके, किरण हुद्दार, उदय पाटील, विशाल कंग्राळकर, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने विकास कलघटगी यांनी विशेष प्रयत्न केले.