Friday , January 3 2025
Breaking News

डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असो. सरचिटणीस पदी सुनील जाधव अविरोध

Spread the love

 

बेळगाव :बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या सरचिटणीस पदी सुनील विजयानंद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहित असोसिएशचे अध्यक्ष राम बदरगडे यांनी दिली.

बेळगाव क्लब रोड येथील इफा हॉटेल येथे सदर निवड प्रक्रिया पार पडली. बेळगाव जिल्ह्यातील 3 हजारहून अधिक डिजिटल ऑन लाईन सेंटर्स उपरोक्त संघटनेचे सभासद आहेत. इफा हॉटेलमधील निवड प्रक्रिये वेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनील जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरचिटणीस सुनील जाधव म्हणाले की, असोसिएशनच्या माध्यमातून कॉमन सर्व्हिस सेंटरचे मालक व शासन यांच्यातील विविध समस्यांबाबत लवकरच विचारमंथन बैठक घेण्यात येईल. तसेच अन्य माध्यमातून मिळणारे पोर्टल सी.एस.सी.ला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येईल. तसेच विविध पोर्टल व ऑनलाईनवर आवेदन पत्र भरणे यासारख्या विविध वेब पोर्टलवर काम करताना येणाऱ्या समस्या शासकीय पातळीवर पाठपुरावा करून सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच राज्यपातळीवर शासकीय योजना राबविल्या जातात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारी त्याचप्रमाणे ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संघटना म्हणून बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशन जिल्हा पातळीवर संघटनात्मक कार्य करीत आहे, असे ते म्हणाले.

कॉमन सर्व्हिस सेंटर कामाबाबतच्या समस्यांची सोडवणूक करणेसाठी संघटना सदैव प्रयत्नशील असून सी.एस.सी.च्या सदस्यांनी संघटित होणे गरजेचे आहे असे मत असोसिएशनचे कामना चौगुले यांनी व्यक्त केले. यावेळी असोसिएशनचे वतीने हमीद इनामदार, संजय मैशाळे, मोशीन ताशीलदार, उदय बरबरी, समिउला मुल्ला, मृत्यूनंजय मंत्रांनावर आदींसह निपाणी, बेनाडी, चिकोडी, गोकाक, खानापूर, बैलहोंगल यासह अन्य भागातील सदस्यांनी सुनील जाधव यांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन मृत्यूंजय मंत्रांनावर यांनी केले, तर संजय मैशाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

खराब वातावरणामुळे रब्बी पीके धोक्यात!

Spread the love  बेळगाव : शेतकरी हा सदैव सलाईनवरच असतो अशीच परिस्थिती सतत निर्माण झालेली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *