बेळगाव (वार्ता) : रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज स्वयंप्रेरित रक्तदान शिबीर घेण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, तसेच युवा रेडक्रॉस सोसायटी यांचाही या शिबिराला सहयोग लाभला. यावेळी महाविद्यालयाच्या 64 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना रोटरी क्लबचे पदाधिकारी अशोक नायक म्हणाले, रोटरी क्लब बेळगाव दक्षिण, भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या युवा रेडक्रॉस सोसायटी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याबद्दल भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे जिल्हा सचिव डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, युवकांना रक्तदानाचे महत्व समजावून सांगण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. एका दात्याने एकदा रक्तदान केल्यास 4 जणांचे प्राण वाचू शकतात. भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या 64 विध्यार्थ्यानी या शिबिरात रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात येत आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …