Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगावात कंत्राटदारांची जिल्हा पंचायतीसमोर जोरदार निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावातील अडीवेप्पा तवग हे कंत्राटदार केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. बिरादार यांनी त्यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे. कंत्राटदार अडीवेप्पा तवग केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. बिरादार यांनी त्यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेने शनिवारी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून बिरादार यांच्यावर कारवाईची मागणी केली. बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावातील कंत्राटदार अडीवेप्पा तवग केलेल्या कामाचे 10 लाख रुपयांचे बिल मागण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांना अर्वाच्य शब्दात अपमानित केल्याचा आरोप निदर्शक कंत्राटदारांनी केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंत्राटदार अडीवेप्पा तवग यांनी सांगितले की, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर विधान परिषदेच्या सदस्यांच्या अनुदानातून 10 लाख रुपयांची कामे केली आहेत. त्यांचे बिल देण्यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता बिरादार त्रास देत आहेत. त्यांना फोन केल्यावर उद्या या असे सांगितले. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर बिरादार यांनी अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केल्याचे कंत्राटदार अडीवेप्पा तवग यांनी सांगून नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निदर्शक कंत्राटदारांची जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी भेट घेऊन, आमच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना शिवीगाळ केल्याचे सांगितले. मी तत्काळ कारवाई करून कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. मला अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात आर. डी. पद्मन्नवर, एस. आर. घोलप्पनवर, एस. सी. गुडस, एम. आर. तुप्पद, आर. ए. तरडे, एस. बी. पाटील, डी. पी. खन्नुकर, एन. पी. जिनगोंडा, एम. के. मुल्ला, एम. बी. हिरेमठ आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *