
बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही बेळगावच्या जाएंटस ग्रुप ऑफ परिवार बेळगाव यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, षुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
शहापूर भारतनगर लक्ष्मी रोड येथील महागणपती मंदिरात शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जाएंट्स परिवाराचा महिला दिन पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सुभद्रा मारुती सांबरेकर, लक्ष्मी बाळू पाटील, प्रणाली शिंदे, बेबी धरानी, शोभा गोविलकर यांना शाल, श्रीफळ, षुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला पै उद्योग समूहाच्या संचालिका, विद्या गुरुदत्त पै प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जाएंट्स परिवाराच्या महिला दिन कार्यक्रमाला सर्वांनी वेळेवर बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विजय खोत यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta