बेळगाव : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या जगात टिकायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण यश खेचून आणू शकतो, असे विचार ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांनी व्यक्त केले.
मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील हे होते. प्रारंभी प्रा. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून संगीतातला व व्यासपीठावरील पाहुण्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. तर के. एम. राऊत यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
या प्रसंगी इयत्ता आठवी व नवीच्या विद्यार्थ्यांची निरोप देणारी भाषणे झाली; तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची निरोप घेणारी भाषणे झाली. आर. ए. कमंगोल यांचे विद्यार्थ्यांना निरोप देणारे भाषण झाले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य सबराव पाटील व मारुती कोतेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून समर्थ शिंदे याची निवड करण्यात आली तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी लक्ष्मी तेरणी हिची निवड करण्यात आली. यावर्षीचा जनरल चॅम्पियन म्हणून रोशन पाटील व कुमारी रेश्मा भगुले हिची निवड करण्यात आली. या सर्वांना प्रशस्तीपत्र व स्मृतचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राजू पाटील, गीता बेडकं, कोमल पाटील, बाळू मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर क्रीडा शिक्षक एस. के. मेंडुले यांनी आभार मानले.