
बेळगाव : भारतीय निवडणूक आयोग सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, 16 मार्च 2024 पासून राज्यभरात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या संदर्भात, कोणतेही राजकीय पक्ष आणि मंदिरे, चर्च, मशीद आणि प्रार्थनास्थळांशी संबंधित प्रशासकीय संस्था किंवा प्रमुख मंदिरे/चर्च/मशीद आणि प्रार्थनास्थळांमध्ये निवडणुकीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रचार उपक्रम राबवू शकत नाहीत. उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta