Wednesday , December 6 2023
Breaking News

आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या

Spread the love

नगरसेवक मंगेश पवार यांच्याकडून पाहणी

बेळगाव : बेळगाव उपनगर परिसरात अनेक नव्या वसाहती निर्माण होत आहेत. नव्या वसाहतींमुळे सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. अशाच प्रकारे आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मंगेश पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर परिसराला भेट देऊन सांडपाणी समस्येची पाहणी केली आहे.
आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. लोकवस्ती वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. पाण्याचा वापर वाढल्यामुळे या भागात जुनी पाईपलाईन सांडपाण्याची समस्या बनली आहे. जुन्या ड्रेनेज पाईप लाईन मधून सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. ड्रेनेज तुंबून सांडपाणी उघड्यावर वाहत आहे. या भागातील अनेक विहीरींचे पाणी सांडपाण्यामुळे दूषित बनले आहे. काही ठिकाणी गटारी ही झालेल्या नाहीत. यासंदर्भात नगरसेवक मंगेश पवार यांनी आज रविवारी सकाळी श्रीराम कॉलनी परिसराला भेट देऊन तेथील सांडपाणी समस्येची माहिती घेतली.
नगरसेवक मंगेश पवार यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून लवकरात लवकर जुनी ड्रेनेज लाईन बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर या भागातील अन्य विकास कामासंदर्भात आमदार अभय पाटील यांच्याशी चर्चा करू करून परिसरातील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला संधी

Spread the love  मंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती बेळगाव : शासनाने राज्यातील महत्त्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *