
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप युवा नेते किरण जाधव यासह अन्य मान्यवरांनी आज भाजप कार्यालयात उमेदवार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा रोवण्यासाठी पुढील रणनीती आखली.
रमेश जारकीहोळी यांनी यावेळी बोलताना, भाजप कार्यकर्ते तळागाळापर्यंत जाऊन प्रचार करतील आणि जगदीश शेट्टर यांना बहुमतांनी निवडून आणतील आणि ‘अब की बार 400 पार’ हे नरेंद्र मोदींचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात युवा पिढी अग्रेसर असून भाजप उमेदवारांना निवडून आणेल, यात तिळमात्रही शंका नाही, असे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
जगदीश शेट्टर यांनी निवडणूक प्रचार आणि प्रसार या संदर्भात सल्ला सूचना केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवडणूक रणनीती संदर्भात आपली मते मांडली.
Belgaum Varta Belgaum Varta