बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स विद्यापीठाच्या मान्यतेने, बापूजी एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने दावणगेरेमधील जगदगुरु जयदेव मुरघाराजेंद्र मेडिकल (जे जे एम एम सी) महाविद्यालयाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बेळगावची सुकन्या डॉ. चिन्मयी सुनील हिरेमठ हिने अतुलनीय कामगिरी करताना एमबीबीएसच्या राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातील बालरोग तज्ञ विभागात सुवर्णपदकासह 7 वा क्रमांक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. डॉ. चिन्मयी हिरेमठ हिने ‘इंटरन्स अकॅडेमिक बॉडी – २०२३-२०२४’ ची कार्यक्षम सचिव म्हणून आदर्श जबाबदारी पार पडली आहे. तसेच डॉ. चिन्मयी हिरेमठ ही अभ्यासाबरोबर खेळातही निपुण असून तिने नेटबॉल व बास्केटबॉल स्पर्धेत 2019 ते 2022 या चार वर्षात ‘राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स संघा’चे प्रतिनिधित्व केले आहे. दावणगेरे येथील जे. जे.एम. एम. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पदवीग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर डॉ. यशा टी. सी. (बेंगलोर), जे. जे.एम. एम.सी. प्रिन्सिपल डॉ. शुक्ला एस शेट्टी, डॉ. मंजुनाथ आलुर व डॉ. रवींद्र बंकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांसह डॉ. चिन्मयी हिचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन विशेष गौरव केला आहे. बेळगावची डॉ. चिन्मयी हिरेमठ ही शिक्षक सुनील हिरेमठ व सौ.सुजाता हिरेमठ यांची सुकन्या व कै. जयश्री हिरेमठ यांची नात आहे. तिला आजोबा, निवृत्त पी.एस.आय. दुंडय्या कोकणी व आजी अन्नपूर्णा कोकणी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळत आहे.