Tuesday , March 3 2026
Breaking News

हिंडलगा कारागृहावर पोलिसांचा अचानक छापा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तपासणी केली आहे.
डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून डीसीपीला बेळगावच्या 5 विभागाचे एसीपी, सीपीआय यांचे सहकार्य लाभले आहे. हिंडलगा कारागृहात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर हा छापा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कारागृहातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी अचानक धडक कारवाई सुरू केली असून, सकाळपासूनच कारागृहात पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *