बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध चेकपोस्टवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना दणका दिला.
काल संध्याकाळी गोकाकच्या घटप्रभा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय वाहतुक करण्यात येत असलेली १.७० लाखांची रक्कम जप्त केली. काल संध्याकाळी ४ च्या सुमारास कुडची चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय नेत असलेली ९,८६,४८० रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय महाराष्ट्राला लागून असलेल्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात चोख बंदोबस्तासह चेकपोस्ट उभारून बेकायदेशीर कारवाया रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल एका दिवसात १४,५६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने बेकायदेशीर कारवाया करणाऱ्यांना धसका घेतला आहे.