Thursday , March 5 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी

Spread the love

 

पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे पाच वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव येथील वैभवशाली शिवजयंती उत्सव ९ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवाबद्दल विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व शिवभक्तांची तातडीची बैठक रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता किर्लोस्कर रोडवरील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक दळवी आणि सरचिटणीस मदन बामणे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *