Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव -वेंगुर्ला महामार्गावर विनायकनगर परिसरात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावरून वाहने वेगाने ये-जा करीत असतात. येथील हिंडलगा गणपती ते हिंडलगा मराठी हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका संभवतो.
बेळगाव -वेंगुर्ला महामार्गावरून प्रामुख्याने सावंतवाडी, चंदगड भागातील वाहनांसह बेळगाव ग्रामीण भागातील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच या परिसरात सिंधी कॉलनी, जयनगर आदी परिसरात लोकवस्ती वाढल्यामुळे या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्यांची देखील गर्दी वाढली आहे. या रस्त्यावरून लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. बऱ्याचवेळा या रस्त्यावर लहानमोठे अपघात घडले आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालून या रस्त्यावर गतिरोधक घालावेत, अशी मागणी हिंडलगा रोड जय नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *