बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना दिनांक 3/4/ 2024 रोजी मार्केट पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार समितीच्या 11 जणांना पोलीस उपायुक्तांनी नोटीस बजावून प्रत्येकी 50 हजार रुपयाचा वैयक्तिक बॉण्ड व प्रत्येकी दोन जामीनदार देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला या सर्वांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सदरची याचिका नववे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. स्थगितीच्या अर्जावर आज सुनावणी झाली. समितीच्या वतीने वकील महेश बिर्जे यांनी बाजू मांडताना सदरची कारवाई एकतर्फी आहे फिर्यादी पोलीसच असून आदेश देणारे पण पोलीसच आहेत, तसेच 11 जणांची कोणतीही बाजू ऐकून न घेता एकतर्फी आदेश बेळगाव पोलीस उपायुक्त यांनी दिला असून सदर आदेश देताना कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सदर बाजू न्यायालयाने ऐकून उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देऊन मार्केट पोलिसांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
सर्वांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.