Sunday , December 14 2025
Breaking News

चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. आनंद आपटेकर यांचे म. ए. समितीकडे अर्ज दाखल

Spread the love

 

बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. आज शनिवार दि. ६ एप्रिल रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे चंद्रकांत कोंडुसकर आणि आनंद आपटेकर यांनी अर्ज दाखल केला. समिती नेते मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्ज स्वीकारला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केला व इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने २ एप्रिलपासून समितीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम इच्छुकांमध्ये साधना पाटील, महादेव पाटील यांनी उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर आज चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. आनंद आपटेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

यावेळी प्रा. आनंद आपटेकर यांच्या समवेत माजी नगरसेवक देवेंद्र हावळ, श्रीकांत खांडेकर, अनिल जाधव, विनायक पाटील, श्रीनाथ पवार, शिवराज चव्हाण, अभय येळूरकर, स्वप्निल आपटेकर, सौरभ पवार, भरत कागे, ज्योती मंडोळकर, मंगल कदम, प्रांजल मुतकेकर, गजानन कावळे, पप्पू मुतकेकर, प्रवीण कुट्रे, सुरज मुतकेकर, महालिंग रनगट्टीमठ, शटवाजी हसबे, नारायण सावगावकर, मनोज हिंडलगेकर, रूपा राहूल आपटेकर उपस्थित होते.
दरम्यान, शेवटच्या दिवसापर्यंत समितीकडे चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी निवड समितीची बैठक होणार असून मुलाखती व इतर सोपस्कार पूर्ण करून त्यानंतर एक अधिकृत उमेदवाराची निवड करण्यात येईल. याकडे समिती कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

Spread the love  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *