
बेळगाव : नुकत्याच मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पेरा ऑलिम्पिक तसेच मांड्या म्हैसूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी सहा सुवर्ण पदके पटकाविली.
कुमार ओम जुवळी याने मांड्या म्हैसूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिकमध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 100 मीटर बॅकस्ट्रोक 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व 100 मीटर रिले मध्ये भाग घेऊन तीन सुवर्णपदके संपादन केली. कुमारी संचिता सातपुते हिने मध्यप्रदेश येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पेरा ओलंपिक स्पर्धेत 100 मीटर फ्रीस्टाइल 100 मीटर बॅक स्ट्रोक व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात 3 सुवर्णपदके संपादन केली.
वरील पॅरा जलतरणपटूंना एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, विशाल वेसणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते तर क्लबचे चेअरमन ऍड. मोहन सप्रे अध्यक्ष शितल हुलबते व श्री. अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लागते.
Belgaum Varta Belgaum Varta