
बेळगाव : विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो, त्याला घडवणं हे शिक्षकांचं काम असतं. त्यांच्या अंतरंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा घेणं गरजेचं आहे मनन, चिंतन करून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. उद्याचा नागरिक हा राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवा. ग्रंथ वाचन, लेखन करणे भावी वाटचालीसाठी आवश्यक असते. कष्ट व प्रयत्न केल्यास हमखास यश प्राप्त होते, असे मौलिक विचार माजी मुख्याध्यापक पी. पी. बेळगावकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना निबंध स्पर्धा कार्यक्रमांत व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय कावळेवाडी यांच्यातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम विभाग शिक्षण संस्थेचे सचिव ए. एल. निलजकर यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत खजिनदार मनोहर मोरे यांनी केले.
प्रास्ताविक संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी करून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली कवी संमेलन, पुरस्कार देऊन गौरविणे, वक्तृत्व स्पर्धा, कथा वाचन स्पर्धा आयोजित करून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती दिली.
निबंध स्पर्धेचे विजेते
प्रथम क्रमांक – कु. नम्रता ल.सुतार (इ.सातवी, बिजगर्णी), द्वितीय – सुहानी श.पाटील (इ.७वी, कावळेवाडी), तृतीय क्रमांक – श्रीराम क.भाष्कळ (इ.७वी.बालवीर बेळगुंदी), चौथा – स्नेहा क. हलकर्णीकर (इ.६वी, बिजगर्णी प्राथमिक शाळा), कु.प्रितीका मा.मोरे (इ.७वी, कावळेवाडी प्राथमिक शाळा).
उत्तेजनार्थ – कु.दर्शना य.जाधव (६वी, कावळेवाडी प्राथमिक शाळा), गणेश बा.गावडे (७ वी, बिजगर्णी प्राथ.शाळा).
यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर पी पी बेळगावकर, वाय पी नाईक,/पी.आर गावडे, माजी मुख्याध्यापक वाय.एच.पाटील, पुंडलिक जाधव, के.आर.भाष्कळ, अर्जुन निलजकर, एस.एन.जाधव, डॉ.परशराम हुंद्रे, यशवंत मोरे, पांडुरंग मोरे, कांचन सावंत, भाऊराव कणबरकर, यल्लापा बुरुड, उपस्थित होते.
सूत्रसंचालन मनोहर मोरे, आभार तेजस्विनी कांबळे यांनी मानले.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मोफत पॅड देण्यात आले. ही स्पर्धा इंजिनिअर विनय नाईक यांनी पुरस्कृत केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta