बेळगाव : बेळगावमध्ये जायंट्सची पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जागतिक स्तरावर काम करणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या विशेष समिती सदस्यपदी २०२४ सालाकरिता पुन्हा एकदा निवड करण्यात आली.
बेळगाव जायंट्स मध्ये त्यांनी अनेक पदे भूषविल्या नंतर गोवा कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले त्यानंतर २०१४ पासून ते विशेष समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
जागितक अध्यक्षा शायना एन सी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत जगभरातील केंद्रीय समिती सदस्य तसेच विशेष समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.