बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा नूतन अध्यक्षपदी श्री. विनायक मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कर्नाटक उत्तर प्रांत अध्यक्षपदी बेळगांव शाखेच्या सौ. स्वाती घोडेकर यांची सार्थ निवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून श्री. के. व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून श्री. डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीचा दायित्वग्रहण समारोह रविवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वा. टिळकवाडीतील जी. जी. चिटणीस स्कूलच्या डॉ. व्ही. एन. जोशी नूतन सभागृहात होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून एलआयसीचे निवृत्त विभागीय अधिकारी डॉ. अरविंद कुलकर्णी व संगीत कलाकार संघाचे अध्यक्ष पं. नंदन हेर्लेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यकारिणीमध्ये सल्लागार म्हणून सर्वश्री व्ही. एन्. जोशी, नामाजी देशपांडे, डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, डाॅ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, जयंत जोशी, श्रीनिवास शिवणगी, स्वाती घोडेकर.
कार्यकारी संघ – सर्वश्री विनायक घोडेकर, मालतेश पाटील, रामचंद्र तिगडी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, चंद्रशेखर इटी, कुबेर गणेशवाडी, कुमार पाटील, अमर देसाई, नामदेव कोलेकर, जयंत कुलकर्णी, ॲड. सचिन जुवळी, पी. जी. घाडी तसेच महिला कार्यकारी सदस्या म्हणून सुखद देशपांडे, प्रा. अरूणा नाईक, जया नायक, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, विद्या इटी, स्नेहा सांगलीकर, लक्ष्मी तिगडी, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, डॉ. प्रेमा ग्रामोपाध्ये, ॲड. बना कौजलगी, संगीता कुलकर्णी, योगिता हिरेमठ, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील यांची निवड करण्यात आली.
भारत विकास परिषदेतर्फे प्रतिवर्षी अनेक सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विकलांग सहाय्यता, आरोग्य तपासणी, रक्तदान, ग्रामविकास, राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा, भारत को जानो, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गुरू वंदना व छात्र अभिनंदन, दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान, शिष्यवृत्ती, संस्कार शिबिर आदिंचा समावेश आहे.
संक्षिप्त परिचय –
नूतन अध्यक्ष श्री. विनायक मोरे हे नामवंत संगीत शिक्षक असून स्वरांजली संगीत संस्थेचे संचालक आहेत. पं. नंदन हेर्लेकर यांचे ते पट्टशिष्य आहेत. विविध शिक्षण संस्थांमधून वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्यांनी गेली 26 वर्षे संगीत अध्यापन केले आहे. समुहगायनाचे मास्टर म्हणून खास परिचित असलेल्या श्री. मोरे यांनी संगीताच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे संगीत कार्यक्रम झाले असून संगीत सेवारत्न, राष्ट्रीय कलाभूषण, आदर्श शिक्षक, सिरीगन्नड, सदभावना प्रशस्ती अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सतत उत्साही असणाऱ्या विनायक मोरे यांचा मित्रपरिवार मोठा असून अनेक संघ-संस्थांच्या सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमी सहभाग असतो.
श्री. के. व्ही. प्रभू (सचिव) – यांचे मूळगाव उडुपी असून गेल्या चार दशकांपासून ते बेळगावमध्ये स्थायिक आहेत. सिंडिकेट बँकेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन संपूर्णपणे सामाजिक तसेच राष्ट्रीय कार्यास वाहून घेतले. अमृता विद्यालयाचे ते सम्पूर्ण व्यवस्थापन सांभाळतात. भारत विकास परिषदेचे ते अनेक वर्षांपासून सक्रीय सदस्य असून परिषदेच्या अनेक राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे.
श्री डी. व्ही. पाटील (खजिनदार) – हे मूळचे खानापूरचे असून अनेक वर्षांपासून बेळगावात स्थायिक आहेत. बी. कॉम. पदवीधारक असलेले पाटील हे प्रथितयश खासगी संस्थेत चीफ अकांऊटंट आहेत. समाज कार्याची त्यांना आवड असून अनेक वर्षांपासून ते भारत विकास परिषदेशी संलग्न आहेत.