बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुवर्णसौधजवळील बस्तवाड गावच्या हद्दीत रविवारी झालेल्या भीषण अपघातात कोथिंबिरीची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
मालवाहू वाहन आणि कोथिंबीर घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बस्तवाड गावातील मल्लप्पा दोड्डकल्लन्नवर (४१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
बेळगावच्या बाजारपेठेत कोथिंबीर घेऊन जात असताना मागून आलेल्या मालवाहू वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा पूर्ण चुराडा झाला. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.