Tuesday , March 3 2026
Breaking News

वडिलांच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मालकाकडून मुलीला मारहाण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काकती गावात एक घृणास्पद घटना नुकतीच घडल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांनी केलेल्या कामाचे पैसे मागितल्याने मालकांनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अर्जुन नामक व्यक्ती काकती येथील एका बँड कंपनीत कामाला होता. गुढीपाडवा असल्याने अर्जुनच्या १७ वर्षीय मुलीने मजुरीचे पैसे त्या बँड कंपनीच्या मालकाकडे मागितले. पण बँड
कंपनीचे मालक अशोक बजंत्री आणि करेप्पा बजंत्री यांनी पैसे देण्यास नकार देऊन त्या पिता-पुत्रीला शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे समजते. या मारहाणीत सदर मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या पालकांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *