Tuesday , March 3 2026
Breaking News

‘त्या’ अपहरणकर्त्यांना शोधून कडक शिक्षा करा : क्रेडाई

Spread the love

बेळगाव: बेेेळगाव शहरातील उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना त्वरित गजाआड करून कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी क्रेडाई बेळगाव या संघटनेने केली आहे.

क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात आले.

कणबर्गी रोड माळमारुती येथे निवासस्थानाजवळून आमचे सदस्य मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण शनिवारी करण्यात आले. या घटनेमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. अपहरणकर्त्यांनी मदनकुमार यांना भयानक परिणामांची धमकी देऊन त्यांचे अपहरण केले.

मारहाणकरून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या. हा प्रकार भविष्यात अन्य उद्योजकांच्या बाबतीत घडू नये यासाठी संबंधित अपहरणकर्त्यांना शोधून काढून कडक शिक्षा करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी क्रेडाईचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्यासह राजेंद्र मुतगेकर, युवराज हुलजी, विजय भंडारी, विजय पाटील, प्रशांत वाडकर, अमर अकनोजी, भगवान वाळवेकर, आनंद तुडियेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *