बेळगाव : लॉरीला पाठीमागून बोलेरो गाडी आदळल्याने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तुमकूर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील चिक्कनहळ्ळीजवळ हा अपघात झाला. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील उमेश नागप्पा आणि संतोष सुरेश अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बोलेरो चालक गंभीर जखमी झाला असून त्याला शिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंगळुरूला द्राक्षांची वाहतूक करणाऱ्या लॉरीला मागून बोलेरोची धडक बसली.
सदर घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.