Monday , December 8 2025
Breaking News

राहुल पाटील यांचे मराठा मंदिरतर्फे अभिनंदन

Spread the love

 

बेळगाव : कलखांब या बेळगावच्या परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या राहुल जयवंत पाटील या तरूणाने यूपीएससीच्या अवघड परीक्षेत देशामध्ये 806 वा क्रमांक मिळवला आणि बेळगावचे नाव उंचावले त्या राहुल पाटील याचा सन्मान मराठा मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने मंगळवारी सकाळी करण्यात आला. मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते त्याला शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आप्पासाहेब गुरव हे बोलताना म्हणाले की, “ग्रामीण भागातून आलेल्या राहुल पाटील यांनी 4 वेळा अपयश आल्यानंतर न थांबता पाचव्यांदा प्रयत्न करून यु पी एस् सी मध्ये जे यश संपादन केले आहे ते कौतुकास्पद असेच आहे. इतर विद्यार्थ्यांना आदर्शवत ठरावे असे हे यश असल्यामुळे आम्ही त्याचा सन्मान केला आहे. इतर तरुनानी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना राहुल पाटील म्हणाले की, “मी ग्रामीण भागातून आलेला असल्याने तेथील युवकांना काय अडचणी येतात याची मला कल्पना आहे. ही अतिशय कठीण परीक्षा असली तरी सुद्धा माझ्या आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने मी ती पाचव्यांदा बसून पूर्ण केली. चार वेळेला आलेले अपयश मी पचविण्याचा प्रयत्न केला. यापुढे मी माझ्या आयुष्यात ग्रामीण भागासाठी आणि खास करून शेतकरी वर्गासाठी काय करता येईल का ते पाहणार आहे, असं सांगून त्यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मराठा मंदिराचे सचिव बाळासाहेब काकतकर, संचालक चंद्रकांत गुंडकल यांचीही अभिनंदनपर भाषणे झाली. आभार प्रदर्शन नेमिनाथ कंग्राळकर यांनी केले. याप्रसंगी मराठा मंदिरचे संचालक नागेश तरळे, लक्ष्मण सैनूचे, नेताजी जाधव, शिवाजी हंगिरकर, विश्वास घोरपडे, बाळाराम पाटील आणि व्यवस्थापक दशरथ डोंबले, अनिल जांबोटकर व दिनकर घोरपडे आदी कर्मचारीही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *