बेळगाव : काल बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपणही योगदान द्यावं व बेळगावातील युवा कार्यकर्त्यांकडून सीमाप्रश्नी माहिती घेऊन महाराष्ट्रातील युवावर्ग सीमावासीयांच्या पाठीशी उभा करावा यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्न सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून व येथील मराठी बांधवावर होणारे भाषिक अत्याच्यार लवकरात लवकर थांबवेत, यासाठी महाराष्ट्रातील तळागाळातील युवकांपर्यंत हा प्रश्न पोहचावा यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, त्यातून महाराष्ट्रात एक आंदोलन उभे राहावे व सीमावासीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा व हा भूभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू अशी भावना सांगलीहून आलेल्या कार्यकर्त्यानी बोलून दाखविली. यामध्ये
रविकिरण विश्वनाथ काशिद, प्रविण सुरेश पारधी, विद्यासागर विश्वनाथ काशिद, अभिनव राजाराम शिंदे, रविकिरण सुकुमार चौगुले, संकेत बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता.