Tuesday , March 3 2026
Breaking News

डॉ. सरनोबत दाम्पत्याकडून जगदीश शेट्टर यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत परिवारातर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी डॉ. सरनोबत दांपत्याने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्याचप्रमाणे शेट्टर यांना सुयश चिंतताना त्यांचा शाल घालून तसेच स्मृतिचिन्ह व चांदीची तलवार देऊन सत्कार केला. आपल्या या भेटीप्रसंगी उमेदवार जगदीश शेट्टर यांनी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह उपस्थित अन्य स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, भाजप नेते किरण जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, रोहितराव साठे, संजय भोसले, ॲड. भास्कर पाटील, सतीश बाचीकर, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी नम्रता हुंदरे, गीतांजली चौगुले, आशाराणी निंबाळकर, मंगल पाटील, दिपाली मलकरी आदींसह स्थानिक रहिवाशी आणि मराठा समाजाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी उमेदवार जगदीश शेट्टर यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *