बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेच्या सभासदांचा गौरव समारंभ बुधवार दि. 8 मे रोजी संपन्न होत आहे.
बँकेच्या ज्या सभासदांचे वय 75 वर्षे झाले आहे आणि ज्यांनी बँकेकडे आपली नावे नोंदवली आहेत अशा सुमारे 80 सभासदांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कलमठ रोड येथील बँकेच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याचबरोबर उत्तम कार्य केलेल्या बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचाही सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन व दैनिक तरुण भारतचे समूह संपादक श्री. किरण ठाकूर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर अथणीच्या कृष्णा शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. जी. एम. पाटील आणि सौहार्द फेडरेशनचे डेप्युटी रजिस्ट्रार श्री. रवींद्र पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर राहणार असून या कार्यक्रमास संबंधितांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. रणजीत चव्हाण पाटील, सीईओ अनिता मुल्या आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta