रेवण्णांना आणखी एक धक्का
बंगळूर : प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ प्रकरण एच. डी. रेवण्णा यांच्या कुटुंबासाठी असह्य वेदना बनले आहे. रेवण्णा यांना अटक केल्यानंतर आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. रेवण्णाच्या वकिलाच्या युक्तिवादाला मान्यता मिळाली नाही. पुढील तपासासाठी न्यायाधीशांनी रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे रेवण्णा यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. त्याना खटल्याच्या चौकशीसाठी कोठडीत ठेवण्याची एसआयटीची विनंती न्यायाधीशांनी मान्य केली आहे.
एच. डी. रेवण्णा यांना एसआयटी पोलिसांनी पीडितेच्या अपहरण प्रकरणात ४ मे रोजी अटक केली होती. रेवण्णाची आज बोरिंग हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाली. नंतर रेवण्णा यांना कोरमंगल येथील १७ व्या एसीएमएम न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेण्यात आले. न्यायमूर्ती रवींद्रकुमार बी. कट्टीमणी यांनी हजर करून चौकशी करण्याची विनंती केली होती. प्राथमिक तपास आणि पुराव्याच्या आधारे रेवण्णाला जामीन नाकारण्यात आला आणि त्याना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
रेवण्णा यांच्या वकिलाने एसआयटी अधिकाऱ्यांच्या युक्तिवादावर जोरदार आक्षेप घेतला. अपहरण प्रकरणात अजामीनपात्र कलम लावण्यात आले आहे. रेवण्णाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, पीडितेच्या वक्तव्याशिवाय कोणताही पुरावा नाही. त्यामुळे त्यांनी रेवण्णा याना पोलीस कोठडीत न घेण्याचा युक्तिवाद केला होता. पोलिसांनी यापूर्वीच तपास केला आहे. त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला.
पोलिसांनी दुर्भावनापूर्ण हेतूने गुन्हा दाखल केला. रेवण्णाविरुद्ध साक्षीदार उपलब्ध नाहीत. घटना कधी घडली? गुन्हा केव्हा दाखल झाला? असा युक्तिवाद रेवणाच्या वकिलाने केला. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी त्याना ४ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याना ५ दिवसांची कोठडी देण्याची विनंती न्यायाधीशांना केली होती. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी त्याना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रेवण्णा आता ८ मेपर्यंत एसआयटी पोलिस कोठडीत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.