Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवजयंती उत्सव मंडळ शहापूरच्या वतीने बॅ. नाथ पै चौक येथे उद्या चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या वतीने शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या चित्ररथाचे पूजन करून शहापूर विभागाच्या चित्ररथ मिरवणुकीचे उदघाटन करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी व्यासपीठ उभारले जाणार असून सहभागी सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यात येईल. तरी महामंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्तांनी उपस्थित रहावे.
तसेच शहापूर येथून निघणाऱ्या चित्ररथाचा मार्ग, शहापूर खडेबाजार, छत्रपती शिवाजी उद्यान मार्गे, श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनिमंदिर, स्टेशनरोड, सेंट मेरीज जवळून उभा मारुती आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी असा असेल तरी सर्व सार्वजनिक शिवजयंती मंडळानी याची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्यवर्ती सा. श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर अध्यक्ष नेताजी जाधव व पदाधिकारी यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *