चिक्कोडी : मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोकटनूर गावच्या शिवारात उघडकीस आली आहे. केशव भोसले (47, रा. दबदबहट्टी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
खंडोबा भोसले (27) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि खून झालेले दोघेही दबदबहट्टी गावचे रहिवासी आहेत. गेल्या 20 वर्षांपासून जमिनीच्या कारणावरून काका-पुतणा यांच्यात भांडण होत होते. काल कोकटनूरच्या हद्दीत दोघे एकत्र येऊन दारू प्राशन केले. दारू प्राशन केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर खून झाला.
हत्येतील आरोपी खंडोबा भोसले (ऐगळी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ऐगळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.