बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्यावतीने आज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शिव आणि बसव जयंती निमित्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बसवेश्वर सर्कल येथे जगज्योती श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याला समाजाचे अध्यक्ष श्री. अजित कोकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष श्री. निरंजन बोंगाळे, उपसेक्रेटरी हेमंत हावळ, देवेंद्र हावळ, सुरेश पिसे, संतोष राजगोळकर, रविकांत पिसे, महेश खटावकर, सचिन पतंगे, प्रसाद बुलबुले, सुहास खटावकर, अजित कोळेकर, पांडुरंग हावळ, उज्वल बोंगाळे, भरत चिकोर्डे आणि अमर कोपार्डे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.