
बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे बिजगर्णी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालोपयोगी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे हे उपस्थित होते.
प्रारंभी इशस्तवन स्वागत गीत सादर केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले.
दरवर्षी संस्था सचिव ए. एल. निलजकर व उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्यात येते.
मान्यवरांचे स्वागत एस. पी. सोरगावी व वाय. एच. पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन केले.
यावेळी व्यासपीठावर विठ्ठल मोरे, यल्लापा बेळगावकर, वसंत अष्टेकर, पुंडलिक जाधव, मनोहर पाटील, आप्पा जाधव, मनोहर बेळगावकर, अशोक कांबळे, पी. एस. भाष्कळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पी. पी. बेळगावकर, वाय. पी. नाईक, एस. आर. मोरे, एस. एम. जाधव, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी धनाजी कांबळे, मलापा भाष्कळ, एस. एन. जाधव, प्रभाकर जाधव, अब्दुल नावगेकर, संजय कांबळे, आर. एम. कांबळे, संजू बेळगावकर, तसेच पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ. आर. पी. सरवणकर, आभार के. आर. भाष्कळ यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta