अथणी : महाराष्ट्रातील सांगोला-जत मार्गावर क्रुझर उलटून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावातील महिला मजुरी काम करण्यासाठी सांगोला येथे जात असताना हा अपघात झाला.
बळ्ळीगेरी गावातील महादेवी चौगला, गीता दोडमणी, मलबाद गावातील कस्तुरी या दुर्दैवी महिला मृत्युमुखी पडल्या तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मिरजेच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कामावर जात असताना डाव्या बाजूचा टायर फुटल्याने क्रूझर उलटली. क्रुझर पलटी झाल्याने वाहन क्रमांक केए 24, एम 1121 क्रमांकाची क्रुझर उलटली. मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta