बेळगाव : हार्डवेअरची वाहतूक होत असल्याची खोटी नोंद करून गोव्यातून आंध्र प्रदेशाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर बेळगावच्या यमकनमर्डी पोलिसांनी जप्त केला आहे.
बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, काल रात्री यमकनमर्डी पोलिसांनी लॉरीमधून सुमारे 28 लाख किमतीची 16,848 लिटर विविध प्रकारची दारू जप्त केली आणि लॉरी चालकासह दोघांना अटक केली.
विविध प्रकारच्या महागड्या दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती यमकनमर्डी पोलिसांनी मिळाली. कंटेनर लॉरीवर छापा टाकून सुमारे २८ लाखांची दारू जप्त केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे एसपी गुळेद यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta