कोडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील कोडीसिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत इचलकरंजीच्या प्रवीण डांगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.
या शर्यतीत दानोळीच्या बंडा शिंदे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ११ हजार रूपये तर इचलकरंजीच्या रवी आरसगोंडा यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या हस्ते शर्यतींचे उद्घाटन झाले.
जनरल घोडागाडी शर्यतीत सौरभ बसन्नवर (बोरगाव) त्यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे ७ हजार रुपये, बबन बसन्नवर (बोरगाव) त्यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे ५ हजार रुपये आणि कृष्णा चौगुले (सांगली) यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे ३ हजाराचे बक्षीस मिळवले.
जनरल एक घोडा एक बैल गाडी शर्यतीमध्ये बंडा नाईक (रुई) त्यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे ११ हजारांचे, दादा महाराज (मानकापूर) यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे ७ हजार रुपये, मनोज यादव (जांभळी) यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे ३ हजाराचे बक्षीस पटकावले.
बिन दाती घोडा- बैलगाडी शर्यतीत लालू पुजारी (मानकापूर) अण्णाप्रेमी (करणाळ) जय कोळेकर (चिपरी) त्यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची बक्षिसे पटकावली.बिनदाती घोडा- गाडी शर्यतीत श्रवणी प्रेमी (धामनी), तात्यासाहेब सिद्देवाडी,लावण्याप्रेमी यांनी बक्षिसे पटकावली.
युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील व मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. यावेळी राजू मगदूम, धर्मराज हावले, शितल सोबाने, संदीप चिप्रे, प्रदीप सोबाने, अभिनंदन फिरगान्नावर, सुधीर बलवान, मोतीचंद चव्हाण, भरत हावले, वैभव नांगरे, मुन्ना मोळवाडे, सागर सोबाने, भरत नागावे, बाहुबली नागावे, अभय पाटील, बन्सी मळवाडे, सागर पाटील, शितल पाटील, पवन डकरे, पोपट खरात, वैभव पाटील त्यांच्यासह न्यू के. एस. ग्रुपचे पदाधिकारी व शर्यत शौकीन उपस्थित होते.
बोरगाव येथे होत असलेल्या कोडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आमचे नेहमीच सहकार्य आहे. शेतकऱ्यांचा खेळ म्हणून समजल्या जाणाऱ्या शर्तीसाठीही आमचे यापुढे सहकार्य राहणार असल्याचे अभिनंदन पाटील यांनी सांगितले.