चंदगड (प्रतिनिधी) : पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीला गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि. १५ मे रोजी हाजगोळी चाळोबा तलाव परिसरात घडली असून वडील सुखरूप आहेत.
याबाबत समजलेली अधिक महिती अशी की, सुळगा (ता. बेळगांव) येथील फिवोना सलोमन जमूला रा. आंबेडकर गल्ली, सुळगा (वय 11) ही मुलगी नुकतीच इयत्ता 5वी परीक्षा दिली होती. तिला सुट्टी असल्याने फिवोना व तिचे वडील सलोमन जमूला हाजगोळी चाळोबा येथे आणले होते. सलोमन जमूला हे सुळगा येथे चर्चमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. दरम्यान ती मुलगी तलावात अंघोळ करायला गेले होती. तिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. ते पाहून वडील सलोमन आणि बाजूला असलेल्या व्यक्तींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवू शकले नाहीत. मात्र, सलोमन यांना बाहेर काढले. दोन मुली आणि वडील कंटाळा घालवण्यासाठी हाजगोळी येथील चाळोबा देवालयाकडे आले होते. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. याची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.