आत्तापर्यंत आपण “त्या” बँकेच्या अंतर्गत व्यवहारातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार पाहिला. अध्यक्षाने संपूर्ण बँक कशी पोखरून ठेवली आणि कर्मचारी व इतर सहकाऱ्यांची पिळवणूक कशी केली हे “बेळगाव वार्ता”ने उजेडात आणले. पण अध्यक्षांचे प्रताप एवढ्यावरच थांबतील तर कसे? बँकेतील लोकांना धरून केलेला गैरव्यवहार कमी होता की काय पैसे कमविण्यासाठी या माणसाने बँकेच्या बाहेर देखील आपले जाळे निर्माण केले होते. बँकेतून देणाऱ्या कर्जाला थेट ग्राहकांना लाभ देण्याऐवजी या सगळ्यात त्याने बाहेरील पाच ते सहा जण एजंट नेमून ठेवले आहेत अशी माहिती हाती आली आहे.
खासकरून ऑटो रिक्षासाठी देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अध्यक्षाने हे दलाल नेमून ठेवले आहेत. एखादा सामान्य नागरिक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जर थेट बँकेकडे कर्जाची मागणी करत असेल तर हा अध्यक्ष त्याना धुडकावून लावतो. कारण जर थेट कर्ज दिले तर अध्यक्षाला पैसे मिळणार नाहीत. एजंटमार्फत कर्ज दिले तर सदर एजंट अध्यक्षाला प्रत्येक कर्जा मागे 10,000 ते 12,000 रुपये दलाली मिळते. म्हणून एक नव्हे दोन नव्हे तब्बल सहा दलाल अध्यक्षाने बेकायदेशीररित्या बँकेच्या बाहेर नेमून ठेवले आहेत आणि हे सर्व जण एका विशिष्ठ समाजाचे असून रिक्षासाठी देण्यात येणारी 90% कर्जे ही त्याच समाजाला दिली जातात. बहुजनांच्या नावावर चालणारी बँक अध्यक्षांच्या कृपेने दुसऱ्याच समाजावर “मेहेरबान” झालेली दिसते.
महिन्याला साधारण ४० ते ५० लोकांना अशी कर्जे वाटली जातात. रिक्षासाठी दिली जाणारी कर्जे पारित करताना सखोल चौकशी केली जाते पण अध्यक्षाने सर्व नियम खुंटीला टांगलेले आहेत. या एकंदर प्रकारावरून आपल्याला लक्षात येईल की “त्या” बँकेच्या अध्यक्षाने किती गैरकारभार आणि भ्रष्टाचार करून पैसा कमाविलेला आहे. स्वतः बांधलेली चार मजली इमारत देखील अश्याच हरामच्या पैशातून बांधली असल्याचे माघारी बोलले जात आहे. ज्या समाजाने आपल्याला नावलौकिक दिला त्याच समाजाच्या बँकेचे अध्यक्ष पद मिळवून असले गैरधंदे करून बँकेसोबत सामजाच्या नावलादेखील लांच्छन लावण्याचे काम या अध्यक्षाने केले आहे.
एजंटकडून मिळणारी बिर्याणी आणि शिरकुर्मावर ताव मारत जनाब “दिग्गु भाई” यांनी मात्र समजाची घोर निराशा केली आहे.
एका मठाच्या ठेवी गिळंकृत करण्यासाठी आता हा अध्यक्ष कारस्थाने रचतोय (क्रमशः)