Tuesday , April 21 2026
Breaking News

मणतुर्गे येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा पायाभरणीचा समारंभ

Spread the love

 

खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी बुधवार दिनांक १५ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्लिंथ (बीम) भरणी समारंभ गावचे वतनदार श्री. राजाराम दत्तू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मंदिराचे पुजारी श्री. जोतिबा दत्तू गुरव यांच्या हस्ते श्री रवळनाथाचे पुजन करण्यात आले. तसेच श्री गणेश पुजन ह. भ. प. महादेव नारायण पेडणेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री बापू शंकर गुंडपीकर, श्री महादेव अमृत पाटील, श्री रवळू रामा देवकरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून प्लिंथ भरणी समारंभ सुरू करण्यात आला. यावेळी प्लिंथ भरणीसाठी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री विठ्ठल धाकलू देवलतकर, श्री बंडू बळवंत देसाई, श्री गावडु नारायण पाटील, श्री गावडु रवळु पाटील, श्री नारायण अप्पु पाटील, श्री निल्लाप्पा नारायण कानशिपकोप, श्री बाबुराव गणपती पाटील, श्री माणिकराव बळवंत देसाई, श्री सदाशिव रामचंद्र दळवी, श्री सटवाप्पा रवळू पाटील, श्री कृष्णा विठोबा चोर्लेकर, श्री महादेव केशव शेंदोळकर, श्री यल्लाप्पा विष्णू देवलतकर, कल्लाप्पा भिमाण्णा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आबासाहेब नारायणराव दळवी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य श्री दत्तू नारायण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला श्री नारायण बाबाजी गुंडपीकर, जीर्णोद्धार कमिटीचे खजिनदार श्री शांताराम पाटील, सेक्रेटरी श्री प्रकाश गुरव, जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य श्री प्रकाश पाटील, श्री रामलिंग चोर्लेकर, श्री विजय भटवाडकर, श्री दीपक पाटील, श्री प्रभाकर बोबाटे, श्री मल्लाप्पा देवलतकर, लैला शुगरचे मॅनेजर श्री बाळासाहेब शेलार, श्री मनोहर गुंडपीकर, श्री मर्‍याप्पा देवकरी, श्री रामचंद्र पाटील, श्री नामदेव गुरव, श्री विष्णू गुरव, श्री गजानन गुरव, श्री गुंडू गुरव, श्री प्रभाकर बोबाटे, श्री नागेश पाटील, श्री भरमाणी देवलतकर इत्यादी बहुसंख्य नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. मंदिराच्या उभारणीसाठी उपस्थित मान्यवरांनी भरीव अशी देणगी देऊ केली.

कार्यक्रमाचे आभार श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *