बेळगाव : बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून केल्याची घटना महांतेश नगर पुलाजवळ घडली.
बेळगाव शहरातील गांधी नगर येथील इब्राहिम गौस (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इब्राहिमचे गांधी नगर येथील एका तरुणीवर प्रेम होते, आज तरुणीसोबत दुचाकी चालवणाऱ्या इब्राहिमला पाहून तरुणीच्या भावानेच त्याची हत्या केली. तरुणीचा भाऊ मुझम्मिल सत्तीगेरी याने स्क्रू ड्रायव्हरने इब्राहिम गौसचा खून केला. जखमी इब्राहिमला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माळमारुती पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta