बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळगा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास घरातील सिलेंडरची गळती झाली. अचानक लाईट लावल्यामुळे स्फोट झाला. यावेळी घरात असलेले कल्लाप्पा पाटील (62) आणि सुमन पाटील (60) हे गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील सर्व वस्तू विखुरल्या गेल्या असून कल्लाप्पा व सुमन हे ७० टक्के भाजले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कपडे, धान्य अशी जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या असून काकती पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.