Sunday , July 26 2026
Breaking News

कोप्पळजवळ भीषण अपघात : ४ जणांचा मृत्यू

Spread the love

 

गदग : हुलीगेम्मा देवीचे दर्शन घेऊन घरी परतताना कोप्पळ तालुक्यातील होसळीजवळ मागून येणाऱ्या खासगी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज पहाटे घडली.

या घटनेत 15 हून अधिक जण जखमी झाले असून जखमींना तातडीने कोप्पळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसवराज (22), करमुद्दी गावातील मुत्तप्पा (22), कोंडाप्पा (60) आणि गदग जिल्ह्यातील थिम्मापुर गावातील दुरुगाम्मा हनुमप्पा (65) अशी मृतांची नावे आहेत.

बसची धडक बसून ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. काही जणांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत जखमींना जिल्हा रुग्णालयात आणून उपचार सुरू होते. याप्रकरणी मुनिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *