हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ महिन्यांपूर्वी दीड लाख रुपये कर्ज होते. भीषण दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्याने घेतलेले पैसे भरण्यास विलंब झाल्याने दोन दिवसांपूर्वी सिद्धव्वा बायन्नावर हिने राजू यांना एकाच वेळी पैसे भरण्यास सांगितले. जो पर्यंत पैसे फेडत नाही तोपर्यंत राजू यांच्या पत्नी आणि मुलाला स्वतःच्या घरात नजरकैदे करून ठेवले. राजूने पत्नी आणि मुलाची नजरकैदेतून सुटका करण्यासाठी महिलेला विनवणी केली, परंतु त्यांची सुटका न झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने यासंदर्भात तक्रार देण्यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी दिरंगाई केली. कंटाळलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta