
बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता, गेल्या २ वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले होते. या संदर्भात म. ए. युवा समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी यांनी युवा समितीच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देत मच्छे -वाघवडे दुरुस्ती संदर्भात आवश्यक पावले उचलावीत अशी सूचना करण्यात आली होती, त्यानंतर बेळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मच्छे – वाघवडे दुरुस्ती संदर्भात मागील आठवड्यात म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळासमवेत रस्त्याची पाहणी करून रस्ता वाहतूकीस प्रतिकूल असल्याने रस्त्याची नव्याने पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले पण निवडणूक आचारसंहिता आणि पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची तातडीने तात्पुरती दुरुस्ती करून आणि नव्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ८ कोटींचा प्रस्ताव पाठविल्याचे असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने म. ए. युवा समितीला दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta