बैलहोंगल : दारूच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला अमानुषपणे मारहाण करून जीवे मारल्याची संतापजनक घटना बैलहोंगल तालुक्यातील मानबरहट्टी गावात घडली.
फकिरव्वा काकी (36) नामक महिला घरात झोपली असता दारूच्या नशेत असलेल्या पतीने झोपलेल्या पत्नीला तिच्या मुलांसमोर बेदम मारहाण केली त्यात फकिरव्वाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर यल्लाप्पा पळून गेला. नेसरगी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस फरारी पती यल्लाप्पा याचा शोध घेत आहेत.