Sunday , July 26 2026
Breaking News

पहिले रेल्वे गेट कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Spread the love

बेळगाव : टिळकवाडी परिसरातील पहिले रेल्वे गेट सोमवारी सकाळी अचानक एका बाजूने तुटून खाली कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. शुक्रवार पेठेकडील बाजूचे हे लोखंडी गेट अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी रहदारी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेच्या वेळी गेटाजवळून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी सतर्कता दाखवत तत्काळ आपली वाहने थांबवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेल्वे गेट परिसर बंद केला आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

दरम्यान, गजबजलेल्या रेल्वे फाटकावरील लोखंडी गेट अचानक कोसळल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात अशा धोकादायक घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेटची नियमित तपासणी व देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *