Monday , May 25 2026
Breaking News

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे दि. 27 रोजी राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान

Spread the love

 

बेळगांव : श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल विकास केंद्र, शाखा बेळगाव यांच्यावतीने देश-विदेश अभियानाच्या वतीने राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार दि. 27 मे रोजी श्री बनशंकरी मंगल कार्यालय सपार गल्ली वडगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी गुरुपुत्र सन्माननीय नितीनभाऊ मोरे यांची दिव्य उपस्थिती लाभणार आहे. सकाळी आठ वाजेपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. सेवा मार्गाद्वारे विनामूल्य राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आणि मार्गदर्शन यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

साहित्यिकांनी समाजाला दिशा द्यावी; बेळगाव साहित्य संमेलनात डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : समाजात वाढत चाललेल्या धार्मिक, भाषिक आणि सामाजिक दुभंगाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *