Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांची बैठक संपन्न; समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील रहात कार्य करण्याचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : रविवार दिनांक २४ मे २०२५ रोजी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक श्री शिवस्मारक येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये युवकांनी मराठी भाषा, संस्कृती तसेच मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा केली.
भविष्यात समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील रहात मराठीसाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी रावसाहेब वागळे कॉलेजचे शिक्षक शंकर गावडा आणि म. ए. युवा समिती बेळगांवचे चिटणीस प्रतिक पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
श्री. शंकर गावडा यांनी सीमाप्रश्नाबद्दल माहिती दिली तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीचा इतिहास सांगितला. आपली मराठी भाषा, शाळा, मराठी संस्कृती टिकली पाहिजे आणि ती जबाबदारी युवकांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली पाहिजे असे सांगितले.

युवा समिती चिटणीस प्रतिक पाटील म्हणाले की, सीमालढा गेल्या ७० वर्षांपासून आपण लढतो आहोत, त्याची सोडवणूक आपले आद्य कर्तव्य आहे, त्याचवेळी शासनाने मराठी भाषा संपविण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करून मराठी शाळा बंद पडाव्या यासाठी छुपा मार्ग निवडला आहे. मराठी शाळा ह्या मराठी भाषेचा कणा आहेत. ह्याच मराठी शाळा जगल्या पाहिजे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे. गावोगावी मराठी संस्कृती संवर्धन करण्यासाठी युवक जागृत झाले पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेल्या नऊ वर्षांपासून सीमाप्रश्न सोडवणुकी सोबतच या सीमाभागातील शाळांसाठी कार्यरत आहे. आणि याच प्रेरणेने खानापूरमध्ये सुद्धा युवा वर्ग एकत्र येत आहे, हे पाहून आनंद होत आहे. या वर्षापासून खानापूर तालुक्यातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जबाबदारी उपस्थित तरुणांनी स्वीकारून आपल्या कार्याची सुरूवात करावी.
यावेळी युवा समितीचे पदाधिकारी साईनाथ शिरोडकर यांनी सुद्धा लढ्यात सोशल मिडीयाचा वापर, स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे, वैभव कारेकर, संदेश कोडचवाडकर, प्रसाद देसाई, यतीन पाटील, मुकेश गुरव, आर्यन पाटील, लक्ष्मण शास्त्री, राम चिखलकर, यश गावडे, प्रथमेश मेलगे, चेतन हंगीरगेकर, विकास पाटील, सोमनाथ गोरे, पृथ्वीराज गुरव, राहुल चापगावकर, आदित्य देसाई, ओंकार पाटील, सोमनाथ गोरे, राघोबा, राम चिखलकर, कपिल, दत्तराज, बापू, निखिल, हर्ष, सिमानी, परशुराम मुतगेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *